हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील सरकार अनेक योजना आणत असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान पिक विमा योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून विमा मिळत असतो. या योजनेअंतर्गत रब्बी पिकाचा विमा 1 डिसेंबर पासून अर्ज करण्यास सुरू होणार आहे. ही अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करून आवश्यक ती कागदपत्र देखील जोडावी लागणार आहे.
सरकारने 31 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. परंतु प्रत्येक राज्यानुसार ही तारीख वेगळी असू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या राज्यानुसार तारीख शोधा आणि पीक विम्याचा अर्ज करायला सुरुवात करा. याबाबतची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी व्हाट्सअप वर चॅट बोर्ड देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार तुम्ही मोबाईलवर स्कॅन करून देखील संपूर्ण माहिती मिळू शकतात. तुम्ही सविस्तर माहितीसाठी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा 1447 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून देखील विम्याची माहिती घेऊ शकता संपूर्ण देशात आहे.
कोणती कागदपत्रे लागतात ?
- बँक खाते क्रमांक
- आधार कार्ड
- फिल्ड गोवर क्रमांक
- शेअर पीक शेती असल्यास कराराची छायाप्रत
- शिधापत्रिका मतदार
- ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना
- शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- पीक पेरणी प्रमाणपत्र