पिंपरी यंदाही राजकीय नेत्यांचा अंदाज चुकवतोय; हा नेता आमदार होईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं… पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार आहे…. हे स्टेटमेंट केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी… 2009 पासून आलटून पालटून निकाल देणाऱ्या या मतदारसंघात अण्णा दोनदा आमदार झाले असले… तरी त्यांची उमेदवारी येणाऱ्या विधानसभेला रेड झोन मध्ये असल्याचं सध्या समोर येतय… पान टपरी पासून अगदी गरिबीतून त्यांनी राजकारण सुरू केलं खरं… पण आमदार झाल्यानंतरची त्यांची निष्क्रियता आणि गोळीबार प्रकरणामुळे त्यांची इमेज बरीच ढासळलीये… विद्यमान आमदार साहेब तुतारीची वाटेने चालत जाणार असल्याची चर्चाही मतदार संघात आहे… भाजपच्या इच्छुकांनीही ही जागा आपल्याला मिळावी यासाठी हायकमांड वर बरेच प्रेशर आणलय… त्यामुळे अजितदादांचा मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचून घेणार का? की या सगळ्या राजकीय डावपेचात शरद पवार इथं गेम चेंजर ठरणार? त्याचंच हे पॉलिटिकल डीकोडींग…

हवामान खात्यावर आणि पिंपरीच्या राजकारणावर कधी विश्वास ठेवायचा नाही… कधी वातावरण आणि आमदार बदलतील सांगता येत नाही… होय… 2009 च्या लोकसभा पुनर्रचनेनंतर हा नवाकोरा पिंपरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा शहरी मतदारसंघ अस्तित्वात आला… राखीव गटात असल्यानं आणि मैदानही पल्याचं असल्यानं इथं अनेक छोट्या मोठ्या पक्षांना आमदारकीची स्वप्न पडू लागली… 2009 ला लोकसभेचा कौल या मतदारसंघाने शिवसेनेच्या बाजूने दिला पण विधानसभेला आमदार मात्र राष्ट्रवादीचा निवडून आला… अर्थात हा कौल होता पिंपरीचे पहिले आमदार अण्णा बनसोडे यांच्या बाजूने… हळूहळू राष्ट्रवादीचे वजन पिंपरीत वाढू लागलं… महापालिकेलाही पिंपरीतून सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादीनेच दिले…त्यामुळे सगळं काही सुखा सुखी असताना… राष्ट्रवादीच्या बाजूने सगळं काही सेट असताना… 2014 च्या उमेदवारीला अगदी चिल मध्ये आमदार होऊ असं वाटतं असताना राष्ट्रवादीचे बनसोडे पडले… आणि निवडणुकीआधीच काँग्रेस टू शिवसेना असा प्रवास केलेले गौतम चाबुकस्वार पिंपरीचे आमदार झाले… यानंतर राष्ट्रवादीचा पिंपरी डाऊन फॉल सुरू झाला… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही राष्ट्रवादीची पडझड झाली… अजितदादांनी या भागाचा विकासाने कायापालट केला खरा… पण भाजप आणि शिवसेनेने दादांचे हे हक्काचे बालेकिल्ले पोखरायला सुरुवात केली… त्यामुळे 2019 ला शिवसेनेकडून चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीकडून बनसोडे अशीच सेम टू सेम लढत झाली… वातावरण राष्ट्रवादीच्या फुल निगेटिव्ह मध्ये होतं… त्यात महायुतीची लाट असल्यानं चाबुकस्वार निवडून येतील… असं वाटत असताना निकाल लागला… आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी पुन्हा कमबॅक करत, राष्ट्रवादीला शहरात जिवंत ठेवलं…

YouTube video player

चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दोन्ही बाजूंनी पसरलेला हा छोटासा पिंपरी विधानसभा मतदारसंघ.. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच डेव्हलप भाग पिंपरीत येत असल्याने हा पट्टा राजकारणाच्या दृष्टीने प्रत्येकाला भुरळ घालत असतो… पिंपरी चिंचवड शहरात एकूण 72 झोपडपट्ट्या आहेत.. त्यातल्या तब्बल 50 च्या आसपास झोपडपट्ट्या एकट्या पिंपरी मतदारसंघात येतात… यावरून या मतदारसंघाचं सामाजिक अस्तित्व किती संमिश्र आहे? याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो… मुस्लीम-दलित बहुल मतं, झोपडपट्टीमुळे स्थानिकांच्या सपोर्टवर इथलं राजकारण चालतं… त्यामुळेच दिसायला साधा असला तरी पिंपरीचं राजकारण तितकच गुंतागुंतीचं आणि बेभरवशी असतं…

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे… तो म्हणजे राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार… राष्ट्रवादी फुटीत ते अजितदादांसोबत राहिले… पण सगळ्याच पातळ्यांवर अण्णांची आमदारकीच नाही तर उमेदवारीही धोक्यात आलीय… पहिलं म्हणजे 2009 ला अण्णांचा अगदी निसटत्या लीडने विजय झाला होता… दुसऱ्या बाजूला 2019 मध्येही जवळच्या चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आतल्या गोटातून मदतीचा हात दिल्यामुळे अण्णांचा पिंपरीतला विजय सोपा झाला होता, अशी मतदारसंघात चर्चा असते… त्यात अजित पवार गटात गेल्यामुळे दलित – मुस्लिम आणि राष्ट्रवादीचा कोअर मतदार आमदार साहेबांवर नाराज आहेच… त्यात गोळीबार प्रकरणात वायरल झालेले शिवीगाळ करतानाचे ऑडिओ, आमदार सुपुत्राचे सीसीटीव्ही फुटेज या सगळ्यामुळे बनसोडेंच्या इमेजला मोठा दणका बसलाय… त्यात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, विधिमंडळातील निष्क्रियता, फुले शाहू आंबेडकर हाऊसिंग सोसायटीची दबक्या आवाजात होणारी चर्चा… हे सगळं विद्यमान आमदार साहेबांच्या अंगलट येऊ शकतं… त्यात मधल्या काळात आमदार साहेब हे शिंदे गटाशी जवळीक साधत असल्याची चर्चा होती… त्यामुळे मतदार संघातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुखावले गेल्याचही बोललं गेलं…

आता हा सगळा इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडेंसाठी मतं मागायला जायचं कसं? अशीही चर्चा दबक्या आवाजात होतेय… त्यामुळे आमदारकी सोडा…अण्णा बनसोडेंची उमेदवारीही सध्या रेड झोनमध्ये आलीये… त्यामुळे भाजपकडून सीमा सावळे, अमित गोरखे, रिपब्लिकन पार्टीकडून चंद्रकांता सोनकांबळे यांच्या नावांपैकी एका नावावर महायुती शिक्कामोर्तब करू शकतं… तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शरद पवार गटाकडून सुलक्षणा शीलवंत तर काँग्रेसकडून डॉ. मनीषा गरुड यांचंही नाव सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे…त्यामुळे पिंपरीच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी बरीच घासाघीस होऊ शकते…. पण अजितदादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरीत मात्र नवा पक्ष… नवा चेहरा… मंत्रीपदावर दिसण्याची दाट शक्यता आहे… त्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रेडिक्ट करण्यासाठी अत्यंत कठीण असणाऱ्या… आणि सतत बदलता कौल देणाऱ्या पिंपरी विधानसभेला यंदा कोणता चेहरा आमदारकीचा गुलाल उधळेल? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.. बाकी अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका