पिंपरी चिंचवड परिसरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पिंपरी चिंचवड येथील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तब्बल सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे फटाक्याचे गोदाम विनापरवाना सुरू होते. काही वेळापूर्वीच या गोदामाला आग लागल्यामुळे परिसरात खळबळ माजली. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत या गोदामातून तब्बल सात जणांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या या गोदामात आणखीन कितीजण अडकले असतील याचा तपास घेतला जात आहे.

दरम्यान, ही भीषण आग पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथे असणाऱ्या फटाक्याच्या गोदामाला लागली आहे. या गोदामामध्ये आणखीन काही कामगार अडकले असल्याची माहिती सांगितली जात आहे. आतापर्यंत या आगीमध्ये तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही आग कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र या भीषण आगेमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.