पिटबुल डॉगचा गायीवर जीवघेणा हल्ला, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – पिटबुल डॉगच्या (pitbull dog) चावण्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पिटबुल प्रजातीच्या श्वानांनी आता माणसांवरच नव्हे तर मुक्या जनावरांवर देखील हल्लाबोल केला आहे. लखनऊ येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पिटबुल (pitbull dog) ने गाईवर भयंकर हल्ला केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कुत्र्याने (pitbull dog) गाईच्या तोंडालाच चावा घेतला आहे. कुत्र्याने गाईचे तोंड आपल्या जबड्यात घट्ट धरले आहे. तेथील उपस्थित नागरिकांनी गाईला कुत्र्याच्या जबड्यातून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी उपस्थित नागरिकांनी कुत्र्याला (pitbull dog) काठीने मारहाण केली. तरी देखील कुत्रा गाईला सोडत नसल्याचे दिसून आले. तर उपस्थित नागरिकांपैकी काहींनी पाण्यात दोघांना घेऊन जाण्याचे सुचवले आणि अखेर पाण्यात गेल्यावर गाईची कुत्र्याच्या तावडीतून सुटका झाली.

हा व्हिडिओ @shubhankrmishra यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तर या घाटावर जाण्यासाठी देखील लोक घाबरत असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!