Pizza Toppings : मूळ इटालीमधला पदार्थ असलेला पिझ्झा आता जगभरात पोहचला आहे. पिझ्झा कुणाला आवडत नाही ? अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा आवडतो. तुम्ही सुद्धा पिझ्झा हा प्रकार घरीच तयार करणे पसंत करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. पिझ्झा टॉपिंग्स (Pizza Toppings) चे काही हटके पर्याय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया …
पनीर टिक्का
तुम्ही नेहमी पनीर पिझ्झा विकत घेत असाल पाम पनीर टिक्का पिझ्झा सुद्धा अप्रतिम लागतो. आता हा घरी कसा बनवायचा ? तर त्यासाठी दह्यात धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, तंदुरी मसाला अथवा गरम मसाला, चाट मसाला थोडं लिंबू, आल लसूण पेस्ट, कांदा, टॉमेटो, मीठ हे सगळं मिक्स करा मग त्यात पनीरचे तुकडे टाका. याला दोन-तीन तास मॅरिनेट करा. आणि पनीर भाजून घ्या हे पनीर तुम्ही पिझ्झावर (Pizza Toppings) टॉपिंग साठी वापरू शकता.
चॉकेलट पिझ्झा (Pizza Toppings)
लहान मुलांना चॉकलेट म्हणजे जीव की प्राण . मग हेच चॉकलेट जर पिझ्झा टॉपिंग म्हणूनमिळाले तर ? तुम्ही चॉकलेट किंवा नेटेला पिझ्झा बेसवर लावून बेक करून त्यावर केळीचे काप किंवा इतर फळांचे काप टाकू शकता. मुलांना हा पिझ्झा नक्की आवडेल. काय मग यंदाच्या सुट्टीत पिझ्झाचे हे टॉपिंग ट्राय करणार ना ?
चीज कॉर्न पिझ्झा (Pizza Toppings)
कॉर्न सूप, कॉर्न भेल, कॉर्न क्रिस्पी हे पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर कॉर्न पिझ्झा ट्राय करा. बाजारात बेबी कॉर्न मिळतात हे सुद्धा तुम्ही टॉपिंग साठी वापरू शकता. किंवा मग कॉर्न चे दाणे वापरू शकता. तुम्ही पिझ्झा करत असाल तर भाज्यांशिवाय चीज कॉर्नचा फंडा वापरू शकता. यात तुम्ही कांदा आणि टॉमेटो फक्त टाकू शकता. मस्त बेक झाल्यानं चीज मेल्ट होते आणि त्यानंतर हा पिझ्झा (Pizza Toppings) अत्यंत स्वादिष्ट लागतो.
बार्बेक्यू पिझ्झा (Pizza Toppings)
तुम्हाला नॉनव्हेज पिझ्झा ट्रे करायचा असेल बार्बेक्यू पिझ्झा चांगला ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे बार्बेक्यू असेल तर त्यावर मस्त बार्बेक्यू चिकन आणि स्मोक्ड चीझ तयार करून त्याचे मस्त टॉपिंग तयार करू शकता. यात तुम्ही टॉमेटो, बार्बेक्यू सॉस, कांदा, ब्लॅक पेपर टाकू शकता.