हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आता उन्हाळ्यात उन्हाळा चालू झालेला आहे. या काळामध्ये अनेक लोकांना त्याचप्रमाणे मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर देशात जाण्यासाठी अनेक लोक प्लॅनिंग करत असतात. परंतु जर तुम्ही यावर्षी देशांतर्गत सुट्टीचे प्लॅन करत असाल, तर तुम्हाला विमान प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे (Plane Fare Hike) लागणार आहे. मागील काही दिवसापूर्वी विस्तारा या विमान कंपनीची अनेक उड्डाण रद्द झाली, त्याचप्रमाणे इंधनाची देखील दर वाढ झाली आहे. आणि उन्हाळ्यातील प्रवाशांची मागणी वाढल्यामुळे आता विमान तिकिटांचे दर हे 20 ते 25 टक्क्यांनी वाढवलेले आहे. अशी माहिती आलेली आहे.
वैमानिकांची संख्या कमी असल्याने विस्तारा या एअरलाईनने दररोज 20 ते 30 फ्लाईट रद्द केलेल्या आहेत. हे प्रमाण त्यांच्या एकूण क्षमतेच्या 10 टक्के आहे. त्यामुळे त्यांची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झालेली असताना. ट्रॅव्हल पोर्ट एक्सीगोच्या विश्लेषणानुसार 1 मार्च ते 7 मार्चच्या कालावधीच्या तुलनेत 1 एप्रिल ते 7 एप्रिलच्या कालावधीत काही मार्गावरील भाडे हे 39 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे.
या ठिकाणी प्रवास करण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे | Plane Fare Hike
यामध्ये दिल्ली ते बंगळुरू या फ्लाईटचे एका बाजूचे भाडे हे 39 टक्क्यांनी वाढवलेले आहे. तर दिल्ली ते श्रीनगर या फ्लाईटचे 38 टक्क्यांनी वाढलेले आहे. दिल्ली ते मुंबई सेवांसाठी 12% आणि मुंबई ते दिल्ली यांचे 8 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर लडाख, मानली की आणि गोवा यांसारख्या लोकप्रिय देशांर्गत पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल, तर या ठिकाणचे विमानांच्या तिकिटांचे दर हे 20 टक्क्यांनी वाढलेले आहे.
यावेळी भरत मलिक यांनी माहिती दिली की, उन्हाळ्याच्या हंगामात देशांतर्गत आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर अपेक्षित विमान भाडे 20 ते 25 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. परंतु विस्ताराची फ्लाईट 10 टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत मार्गावरील विमान तिकीटांच्या किमतीवर परिणाम झालेला आहे.