Planetary alignment | यंदा 8 एप्रिल 2024 रोजी या वर्षातील सगळ्यात पहिले सूर्यग्रहण झाले. त्या सूर्यग्रहणाची खूप जास्त चर्चा देखील झाली. परंतु आता 2024 च्या दुसऱ्या सूर्यग्रहणाविषयी जास्त चर्चा चालू आहे. हे सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण दिसण्यासाठी आणखी पाच महिने अवकाश आहे. खगोलीय घटनेची अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु जर आकाशात घडणाऱ्या घटनांमध्ये स्वारस्य असेल, तर त्यासाठी फक्त एक आठवडा एवढीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्लॅनेटरी अलाइनमेंट | Planetary alignment
ही घटना 3 जून रोजी देखील घडू शकते. जेव्हा सहा ग्रह म्हणजेच बुध, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे एका रेषेत दिसतील, याला प्लॅनेटरी अलाइनमेंट असे म्हणतात. ज्यामध्ये पृथ्वी एक बिंदू असेल जेथून सहा ग्रह एका सरळ रेषेत किंवा एकमेकांच्या अगदी जवळ दिसतात.
दुर्बिणी शिवाय दिसणार हे ग्रह
हे दृश्य 3 जून रोजी दिसणार आहे. 3 जून रोजी दिसणारे हे सहा ग्रहांपैकी काही ग्रह हे दुर्बिणी शिवाय देखील दिसू शकतात. यामध्ये चंद्राचे महत्त्वाची भूमिका असेल. त्याच्या प्रकाशामुळे इतर ग्रहांची चमक थोडीशी कमी देखील होऊ शकतात. मंगळ, शनी, गुरु हे ग्रह अंधुक दिसतील. युरेनस आणि नेपच्यूनला पाहायचे असेल, तर त्यांना दुर्बिणीचा वापर करावा लागणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार शनि हा प्रथम चमकदार दिसणार आहे. त्यानंतर नेपच्यून दिसेल त्याला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागणार आहे. तुम्हाला जर हे ग्रह पाहायचे असेल तर तुम्ही नासा आणि इतर वेबसाईटवर भेट देऊन देखील हे पाहू शकता.
दुसरे सूर्यग्रहण
2024 चे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही घटना ज्योतिष शास्त्र आणि सनातन धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. हे सूर्यग्रहण हिंदू कॅलेंडरमधील सर्वपितृ अमावस्याशी जुळणारे त्याचप्रमाणे कल्पना कृती ग्रहण असेल. या ग्रहणादरम्यान चंद्र सूर्यापेक्षा लहान दिसतो. ज्यामध्ये घडत मध्यभागी सूर्यप्रकाशाचे तेजस्वी वलय देखील असणार आहे. या खगोलीय देखाव्याला रिंग फायर असे देखील म्हटले जाते. हे दृश्यमान सहा तासांपेक्षा जास्त वेळ असणार आहे. रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी हे सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजून 17 मिनिटांनी हे संपेल.