गोवा हे असं ठिकाण आहे जिथे जाण्याचा आणि एन्जॉय करण्याचा अनेकजण प्लॅन बनवत असतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. कलिंगूट बीच ,अंजुना बीच ,बागा बीच ,पालोलेम बीच, चर्च अशी ठिकाणं प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्ही सुद्धा भेटी दिल्या असतील.
मात्र गोव्यात अशीही काही ठिकाणी आहेत जिथे तुम्ही कदाचित गेलाच नसाल पण हे ठिकाण अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय आहे. याच काही ठिकाणांबद्दल आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
चोरला घाट
खरंतर गोवा म्हटलं की समुद्रकिनाऱ्यांचा प्रदेश हेच आपल्यासमोर येते. मात्र गोव्यातील हिल स्टेशन म्हणजे चोरला घाट. जर तुम्हाला सुंदर अशा निसर्गात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला इथं हिरवळ, धबधबे आणि पर्वतरांगांमध्ये मनःशांती जरूर मिळेल. हे ठिकाण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. तुम्हाला इथे गिर्यारोहण आणि ट्रेकिंगची सुद्धा संधी मिळेल. यादरम्यान तुम्हाला धबधबा लसणी टेंप शिखर आणि चोरला घाट पॉईंट यासारख्या सुंदर ठिकाणांना भेटी देता येईल. मात्र यासाठी तुम्हाला तिथे जाण्यासाठीच्या योग्य हवामानाची माहिती घेणे आवश्यक आहे.
दांडेली
दांडेली अभयारण्य हे तुम्हाला ऐकून माहिती असेलच गोव्यापासून जवळपास 102 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण… इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन तास लागू शकतात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून अंदाजे १५५१ फूट उंचीवर वसलाय सफारी टूर, बोटिंग आणि ट्रेकिंग यासाठी अनेक उपक्रम इथे करायला मिळतात. येथील चांदेवाडी वॉटर रॅपिड्स, कावळा लेणी, सिंथेरी रॉक्स, उलवी लेणी, गणेशगुडी धरण, सायक्स पॉइंट, मौलांगी नदी, क्रोकोडाइल पार्क, सातखंडा धबधबा, दिग्गी, बॅक वॉटर, सातोडी धबधबा, मगोद फॉल्स, जैन कल्लू गुड्डा, शर्ली फॉल्स, पानसोली इ. कॅम्प, टायगर रिझर्व जंगल सफारी अशी ठिकाणे पाहता येतील.
आंबोली
गोव्यापासून जवळच असलेलं हे एक हिल स्टेशन असून गोव्यापासून तीन ते चार तासात तुम्ही इथे जाऊ शकता. हे ठिकाण म्हणजे डोंगरदऱ्यांनी भरलेलं आणि धबधब्यांनी नटलेले ठिकाण… घनदात जंगलांनी वेढलेला हे ठिकाण तितकच निसर्गानं समृद्ध आहे. अनेक प्रकारची झाड आणि प्राणी इथे पाहायला मिळतात. तीनशे फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा हे इथलं वैशिष्ट्य. पावसाळ्यात इथं हेच पाहण्यासाठी लोक गर्दी करत असतात या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही शिरगावकर पॉईंट, कोलशेत पॉईंट आणि नांगरता फॉल्स या ठिकाणांना भेटी घेऊ शकता.