Plastic Cooler Vs Metal Cooler, कोणता कुलर Best?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, सध्या उन्हाळा सुरु असून गर्मीच्या या दिवसात जिणं मुश्किल झालय. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून कडक उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होतेय. यावर मात करण्यासाठी आपण पंखा, कुलर आणि AC चा वापर करतो. परंतु यामधील AC च्या किमती महाग असल्यामुळे सर्वानाच काय तो परवडत नाही. अशावेळी मध्यमवर्गीय लोक कुलरकडे वळतात. कुलर हे वापरायला अतिशय छान आणि परवडणाऱ्या किमतीत असल्यामुळे लोकांची मागणीही वाढली आहे. बाजारात सध्या 2 प्रकारचे कुलर विकले जात आहेत. एक म्हणजे प्लास्टिक कुलर (Plastic Cooler) आणि दुसरा म्हणजे मेटल कूलर (Metal Cooler) …. यामधील नेमका कोणता कुलर घ्यायचा यावरून तुमच्या मनात गोंधळ असेल तर आज आम्ही तुम्हाला या दोन्ही कुलर बाबत सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा की तुमच्यासाठी कोणता कुलर योग्य आहे.

1) प्लास्टिक एअर कूलर- (Plastic Cooler)

प्लॅस्टिक एअर कूलर हा वजनाने अतिशय हलका असतो त्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणे सोप्प पडत. तुम्ही कुठेही बसला तरी त्याठिकाणी कुलर ठेऊ शकता.

प्लास्टिक कुलर हा पैशाच्या बाबतीत सुद्धा मेटल कुलरपेक्षा प्लास्टिक कुलर परवडणारा ठरतो. त्यामुळे खास करून मध्यमवर्गीय लोक प्लास्टिक कुलरकडे आकर्षित होतात.

बाजारात तुम्ही प्लास्टिक कुलर खरेदी करायला गेला तर तुमच्या त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि कलर मध्ये अनेक व्हरायटी मिळतात. त्यामुळे तुम्हाला हवा तसा कुलर तुम्ही घेऊ शकता.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हंणजे प्लास्टिक कुलर मध्ये शॉक लागण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्यांच्या घरात लहान बाळ आहे अशी लोकही बिनदास्तपणे हा कुलर खरेदी करू शकतात.

आता आपण प्लास्टिक कूलरच्या तोट्याबाबत पाहुया… यातील पहिला तोटा म्हणजे प्लास्टिक कूलर मधून मेटल कूलरइतका थंडपणा मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे कुलर जास्त काळ काळ टिकत सुद्धा नाहीत.

2) मेटल एअर कूलर- (Metal Cooler)

ज्या व्यक्तींना जास्त कुलिंग पाहिजे असत अशा लोकांसाठी मेटल एअर कूलर हा एक चांगला पर्याय आहे.

अगदी तुमच्या घरात मोठा हॉल असेल तरीही मेटल कुलरच्या माध्यमातून तुम्हाला हवा तसा गारवा मिळू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे मेटल कूलरमध्ये मजबूत मोटर आणि पंखा असतो, जो जास्त हवा फिरवण्याचे काम करतो.

मेटल एअर कूलर हे टिकाऊ असतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते तुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते.

आता आपण मेटल कुलरच्या तोट्याबाबत पाहूया, यातील मुख्य तोटा म्हणजे मेटल कुलर वजनाने जड असलयामुळे एका जागेवरून दुसरीकडे हलवणे कठीण होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिक कुलरपेक्षा मेटल कुलर हे महाग असतात, त्यामुळे तुमच्या खिशाला चाप बसू शकतो.