PM Care Children Scheme | काय आहे सरकारची PM केअर चिल्ड्रन योजना? जाणून घ्या फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Care Children Scheme | केंद्र सरकार हे समाजातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक व्यक्तीचा विचार करून विविध योजना आणत असतात. ज्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अगदी लहानांपासून ते दृष्टांपर्यंत सगळ्यांसाठी विविध योजना आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी एक योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान केअर चिल्ड्रन योजना (PM Care Children Scheme) असे आहे. ही योजना 2021 मध्ये चालू झालेली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या आरोग्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा खर्च केला जातो. तो मुलगा 23 वर्षाचा पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत केली जाते. आताही पीएम केअर सेंटर नियोजन नक्की काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच आरोग्य सुविधा देखील पुरवण्यात येतात. यासोबत आयुष्मान कार्ड देखील बनवले जाते.

कोणत्या मुलांना मदत मिळणार ? | PM Care Children Scheme

केंद्र सरकारने 29 मे 2021 रोजी ही पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत covid-19 मुळे ज्या पालकांचा मृत्यू झालेला आहे. अशा मुलांना याचा फायदा होणार आहे. ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू हा 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेला आहे, त्यांनाच मिळणार आहे. सरकार या मुलांचा खर्च या योजनेअंतर्गत पूर्णपणे उचलते. या योजनेअंतर्गत मुलांच्या आरोग्य विमा शिक्षणासाठीचा खर्च देखील उचलला जातो. ते मूल 23 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत सरकार त्यांचा पूर्ण खर्च करणार आहे. आता या योजनेअंतर्गत कोणाला फायदा मिळणार आहे हे जाणून घेऊया

या योजनेअंतर्गत कोणते फायदे होतात

या पीएम चिल्ड्रेन्स स्कीम अंतर्गत वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याचे पूर्ण पालन पोषण संगोपन शाळेचा खर्च आरोग्य खर्च लसीकरण अंगणवाडी सेवा या सगळ्याचा खर्च दिला जातो. जर मुलाचे वय दहा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर या योजनेअंतर्गत त्याला जवळच्या शाळेत दाखल केले जाते. याला सरकारी खाजगी किंवा KV या योजनेअंतर्गत मोफत गणवेश दिले जातात. पुस्तक देखील दिले जाते किंवा एखाद्या खाजगी शाळेत त्याला कायद्या अंतर्गत फीमध्ये सूट देखील दिली जाते.

18 वर्षापर्यंत मुलांना कोणते फायदे मिळतील ? |PM Care Children Scheme

जर मुलाचे वय हे 11 ते 18 वर्षे दरम्यान असेल, तर आणि तो मोठ्या कुटुंबात राहत असेल. तर त्याला जवळच्या शाळेत ड्रेस कॉलर म्हणून प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर शाळा बंद झाल्यावर मुलाच्या राहण्याची व्यवस्था देखील केली जाते. या योजनेअंतर्गत मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची माहिती पीएन चिल्ड्रन पोर्टलवर अपडेट केली आहे.