Pm Crop Insurance Yojana | शेतकऱ्यांनी 1 रुपयात लवकरात लवकर पीक विमा; कृषी मंत्र्यांनी केले आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pm Crop Insurance Yojana | प्रधानमंत्री पिक विमा योजना ही देशातील एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढायचा आहे. आणि आता विमा सगळ्यांनी लवकरात लवकर काढावा. अशी मागणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. जर अतिवृष्टी, वादळ, पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर या विमा योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये.यासाठी सरकारने हा एक रुपयाचा विमा योजना (Pm Crop Insurance Yojana) काढलेली आहे. चालू वर्षात आता या योजनेत जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले.

पंतप्रधान पिक विमा (Pm Crop Insurance Yojana) योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर जाऊन हे अर्ज करायचे आहेत. शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून या पिकाचा विमा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे पिक विमा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आली, तर जिल्हास्तरावर पीक विमा प्रतिनिधी यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.

योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? | Pm Crop Insurance Yojana

या योजनेमध्ये खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. या सर्व पिकांचा आपण प्रति अर्ज एक रुपया द्यायचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, पीक पेरा घोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची गरज आहे. तुम्ही स्वतः पोर्टलवर जाऊन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन हा अर्ज करू शकता.