PM Internship Scheme | केंद्र सरकार हे राज्यातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असतात. तरुणांसाठी देखील अनेक योजना आणत असतात. आपला भारत देश हा तरुणांवर आधारित आहे. त्यामुळे तरुणांसाठी देखील रोजगाराच्या अनेक संधी सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत. आणि इथून पुढे देखील या सगळ्या निर्माण होणार आहेत. आणि यासाठी आता सरकारने आणखी एक नवीन योजना आणली आहे. ज्या योजनेचा लाभ सगळ्या तरुणांना होणार आहे. या योजनेचे नाव पीएम इंटर्नशिप योजना अशी आहे. या योजनेअंतर्गत आता तरुणांना नोकरीची संधी देखील उपलब्ध होणार आहे.सरकारच्या या पंतप्रधान इंटर्नशिप (PM Internship Scheme) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता नोकरी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत 3 ऑक्टोबर पासूनच रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे.
काय आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजना ? | PM Internship Scheme
सरकारची ही पंतप्रधान इंटर्नशिप योजना पाच वर्षासाठी राबवण्यात आलेली आहे. या अंतर्गत 500 कंपनीमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सरकारने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप देखील केलेली आहे. या अंतर्गत 24 सेक्टरमध्ये 80 हजारापेक्षा जास्त संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची पात्रता आणि अटी
- या प्रधानमंत्री अंतर्गत तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुमचे वय 21 ते 24 वर्ष वयोगटातील असणे गरजेचे आहे.
- पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी हा भारताचा रहिवाशी असावा.
- तसेच तो व्यक्ती इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसावा.
- पदवीध किंवा बारावी पास झालेले तरुण शिक्षण करतानाही इंटर्नशिप करू शकतात.
- ऑनलाइन कोर्स करणारे तरुण देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेअंतर्गत तरुणांना सरकारकडून 4500 स्टाइपेंड मिळणार आहे तसेच 6000 रुपयांचे अनुदान देखील मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे.
पीएम इंटरशिप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 193 कंपन्यांमध्ये 12 ऑक्टोबर पासूनच नोंदणी सुरू झालेली आहे. ज्युबिलंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर्स, लार्सन अँड टुर्बो, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत चांगली योजना आहे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेता घेता रोजगार निर्मिती देखील होणार आहे.