PM Kisan 16th Installment | ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसान योजनेचा 16 वा हप्ता, यादीत तपासा तुमचे नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan 16th Installment | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि महत्वाची योजना आहे. आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आत्तापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्ते जमा केले आहेत.

आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता येणार आहे. परंतु काही शेतकरी असे आहेत ज्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळणार नाही. तर आपण पाहणार आहोत असे कोणते शेतकरी असणार आहेत, ज्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळणार नाही.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु असे अनेक शेतकरी असणार आहेत ज्यांच्या खात्यात पैसे मिळणार नाही.

त्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली एक मोठी चूक असू शकते. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ईकेवायसी पूर्ण केले नाही. त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे जर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना पाहिजे असेल, तर त्यासाठी त्यांनी केवायसी करणे खूप गरजेचे आहे.

आतापर्यंत या पीएम किसान योजनेअंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 15 व्या हप्त्यात जवळपास 8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले गेले आहेत.

शेतकऱ्यांनी हे काम करणे गरजेचे | PM Kisan 16th Installment

जर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी पुढील हप्ता मिळण्यापूर्वी ईकेवायसी करणे किंवा त्यात सुधारणा करणे खूप गरजेचे आहे. नाव या लाभार्थी यादीत आहे परंतु त्यांनी केवायसी केलेले नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा सीएससी केंद्रात जाऊन ही ईकेवायसी करणे खूप गरजेचे आहे.