PM Kisan and Namo Shetkari Mahasanman | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असतात. यातीलच केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. अशातचा आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2 हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच आता देशभरातील शेतकऱ्यांना 4 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे हस्तांतरित केले जाणार आहे.
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2018 मध्ये चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4 हप्ते दिलेले आहे आणि आता पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील जवळपास 91.53 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा निधी जमा होणार आहे. असे एकूण 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
परंतु या योजनेचे दोन्ही हप्ते जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्ही इ केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. इ केवायसी करण्यासाठी तुम्ही शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊ शकता. आणि केवायसी टॅबवर क्लिक करून आधार क्रमांक नोंदवला जाईल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी दाखवल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. अशाप्रकारे तुम्ही केवायसी करू शकता, केवायसी केले नाही, तर तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे येणार नाहीत.