PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनेचे नाव पीएम किसान मानधन योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठीची ही पेन्शन योजना देखील आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे. यामुळे वयाच्या 60 वर्षांनंतर ज्यांना शेतीची कामे करता येत नाहीत अशा शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे.

Pradhan Mantri Kisan Maandhan yojana - GST Suvidha Kendra

PM Kisan Maandhan Yojana विषयी जाणून घ्या

देशातील शेतकऱ्यांना म्हातारपणी पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 36,000 रुपये वार्षिक पेन्शन दिली जाते.

क्या पीएम सम्मान योजना में आपका नाम है शामिल? हर महीने मिलेंगे 3 हजार रुपये | PM Kisan Scheme: Is your name included in PM Samman Yojana

या योजनेचा लाभ कसा घ्यावा ???

PM Kisan Maandhan Yojana चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन नंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रीमियम म्हणून दरमहा काही पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या वयानुसार ही रक्कम निश्चित केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात.

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

PM Kisan Maandhan Yojana मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे आपले वार्षिक उत्पन्न आणि आपल्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. यासोबतच ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत त्याचे डिटेल्स द्यावे लागतील. ही सर्व माहिती दिल्यानंतर एक अर्ज मिळेल जो आधार कार्डशी लिंक करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड दिले जाईल.

Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana: किसानों को हर वर्ष मिलेंगे 36000 रुपये, महीने में जमा करने होंगे सिर्फ 55 रुपये - Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana how to register for pm kisan

अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज

PM Kisan Maandhan Yojana मध्ये सहभागी होण्यासाठी आपण ऑनलाइन अर्जही करू शकाल. यासाठी या योजनेसाठी बनवलेल्या अधिकृत वेबसाइट http://maandhan.in ला भेट द्यावी लागेल. येथे या योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म जमा करावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही 1800-267 6888 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://maandhan.in/

हे पण वाचा :

IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये केली 290 पट वाढ

Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा