PM Kisan Sanman Nidhi Yojana 2024 | पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळण्यासाठी ‘ही’ कामे आजच करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Sanman Nidhi Yojana 2024 | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सगळ्यात मोठी योजना आहे. अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी 2 हजाराचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जागी केला जातो.

28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Sanman Nidhi Yojana 2024) 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. यासाठी केंद्र सरकारने 21000 कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे. याचा फायदा देखील शेतकऱ्यांना झालेला आहे. आता शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. परंतु आता 17 वा हप्ता केवळ त्याच लोकांना मिळणार आहे. जे लोकांनी केवायसी केलेले आहे ही सरकारने आता सरकारने हा आदेश काढलेला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेले नाही. त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन इकेवायसी करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर ओटीपी आधारित तिथे ई केवायसी उपलब्ध आहे. बायोमेट्रिक केवायसी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन देखील पूर्ण करू शकता.

सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील लाखो शेतकऱ्यांना होत असतो. या योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झालेला आहे. तर 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झालेला आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी 2 हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले. जातात पीएम किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जूनमध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी? | PM Kisan Sanman Nidhi Yojana 2024

  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर फार्मर कॉर्नर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांक टाका. तुमचे राज्य निवडा आणि ओटीपी येईल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर राज्य जिल्हा बँक तपशील आणि वैयक्तिक माहिती भरा.