PM Kisan Scheme : ITR मूळे PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ शेतकरी ठरणार अपात्र; योजनेचा निधीसुद्धा परत जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Kisan Scheme) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याहेतू १ डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर प्रत्येक ४ महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ITR म्हणजेच प्राप्ती कर भरण्याची अट घातली आहे. परिणामी आता अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

इतकेच नव्हे तर, येणाऱ्या काळात ज्या शेतकऱ्यांनी ITR भरून या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. (PM Kisan Scheme) दरम्यान, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधीद्वारे तेवढाच निधी दिला जाणार असल्याचे समजत आहे. मात्र या निधीच्या चौकटीमध्ये केंद्र सरकारने ITR ची अट घातल्याने काही शेतकरी या योजनेतून अपात्र होणार आहेत. तर जाणून घेऊया कोणते शेतकरी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत.

कोणते शेतकरी ठरणार अपात्र?

(PM Kisan Scheme) ITR मूळे पीएम किसान योजनेतून काही शेतकरी अपात्र ठरणार आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सलग ३ वर्ष किंवा सलग २ वर्ष ITR भरला आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांचा ITR ड्यू आहे, पण भरलेला नाही असे शेतकरीसुद्धा या योजनेतून अपात्र ठरतील. याशिवाय एखाद्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीने जरी ITR भरला असेल किंवा भरत असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अपात्र शेतकऱ्यांकडून होणार ITR ची वसुली (PM Kisan Scheme)

ज्या शेतकऱ्यांनी ITR भरुनसुद्धा योजनेचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्यांकडून सरकार थकबाकी वसूल करेल. तसेच ITR भरूनही योजनेच्या निधीचा लाभ घेतलेली रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात हे शेतकरी या योजनेचा पुन्हा लाभ घेऊ शकत नाहीत.

कोणते शेतकरी ठरणार पात्र?

ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न सरकारच्या मर्यादेपेक्षा कमी आहे आणि त्यांनी पीककर्जासाठी १६ नंबरचा फॉर्म भरला आहे किंवा नील फाईल केली आहे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल. (PM Kisan Scheme) तसेच ज्या शेतकऱ्यांनी २०१९ नंतर केवळ एकदाच प्राप्तीकर भरला आहे, अशा शेतकऱ्यांनादेखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

… तर १६वा हफ्ता मिळणार नाही

ज्या शेतकऱ्यांची ई- केवायसी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना १६ वा हप्ता मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, सध्या राज्यातील १ लाख १४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे. (PM Kisan Scheme)