PM Kisan Yojana : ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आपली महत्वकांक्षी योजना पीएम किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार वार्षिक 6000 /- रुपये जमा करत आहे. दरवर्षी प्रत्येकी 2000 असे 3 हप्ता तुन हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आले असून आता 14 वा हफ्ताची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याचे पैसे मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. असे सांगण्यात येत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ते 31 मे दरम्यान 14 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी महिन्यात 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला होता.

PM Kisan Yojana चे पैसे मिळवण्यासाठी ‘हे’ करा

पीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आजच तुमच्या मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना घरात बसून अर्ज करता येतो तसेच आर्थिक लाभही घेता येतो. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी अँप डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

पीएम किसान योजना ही भारत सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे

वास्तविक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) सुरू केली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या अंतर्गत ही एक केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे, ज्याचा उद्देश मदतीची गरज असलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. पूर्णतः सरकारच्या संकल्पनेतून आकारास आलेली हि योजना असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही मर्यादित जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांसाठी लागू होते .

या योजनेचे नियम बदलताना, सरकारने लाभार्थ्यांची खाती Know-Your-Customer (KYC) शी लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्यांचे केवायसी झाले नाही त्यांच्या खात्यात 13 व्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. तुम्ही तुमचे ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, अन्यथा 14 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.