PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर, ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 16 वा हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Yojana | सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अनेक नवनवीन योजना काढल्या आहेत. त्यातीलच प्रधानमंत्री किसान योजना ही भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी शेतकऱ्यांना उत्पन्न देते. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये मिळतात. हे 6000 रुपये दोन दोन हजाराच्या हप्त्याने तीन हप्ते वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रक्कम ही वर्षभरात ही जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि कृषीसाठी लागणाऱ्या इतर उपकरणांसाठी वापरता येतात.

यादी केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खातात 15 वा हफ्ता जारी केला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केलेला गेला आहे. परंतु आता शेतकरी 16 व्या हाताची वाट पाहत आहे. एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

या दिवशी येणार सोळावा हप्ता

हाती आलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता हा या महिन्याच्या अखेरीस म्हणजे फेब्रुवारी 2024 च्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती योग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो.

पीएम किसान योजनेसाठी केवायसी करणे गरजेचे | PM Kisan Yojana

या योजनेचे महेंद्रगड जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर रवींद्र यादव यांनी सांगितले की, या योजनेसाठी एक लाख 2500 शेतकरी पात्र आहे. त्यापैकी 93 हजार 791 शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही आणि उर्वरित 8 हजार 709 शेतकऱ्यांनी केवायसी केलेले आहे. त्यामुळे आता इ केवायसी जे लोक करणार नाही. त्यांच्या खात्याची रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएमसी योजनेचा सोळावा हप्ता पाहिजे असेल, तर त्यांनी लवकरात लवकर ये केवायसी करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्यांना हा हप्ता मिळणार नाही.