PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना खुशखबर!! PM Kisan योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार

0
17
PM Kisan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Yojana – केंद्र सरकारने लोकांच्या कल्याणासाठी अन त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या महत्वाच्या योजनांमधील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सम्मान निधी . या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले असून , योजनेच्या 9PM Kisan Yojana) 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळावी आहे.

किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता (PM Kisan Yojana) –

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना दुपारी 2 ते 3.30 वाजेदरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे . तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या हप्त्याबद्ल माहिती दिलेली आहे. पण जे लोक या योजनेचा लाभ घेणार आहेत , त्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून , आता फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया –

शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in भेट द्यावी.

लाभार्थाची यादी पाहण्यासाठी pmkisan.gov.in वेबसाईटला भेट द्या.