मोदी सरकारकडून जिंवत शेतकरी मृत घोषित; गावात तिरडी आंदोलन पेटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही मोदी सरकारच्या योजनांमधील सर्वात महत्वपूर्ण मानली जाणारी योजना आहे. मात्र आता याच योजनेतंर्गत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनामध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच मृत दाखवण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमार्फत वर्षभरात शेतकर्यांच्या खात्यावर तीन टप्प्यांमध्ये ६ हजार रुपये जमा होतात. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे. मात्र गेल्या काही काळात सरकारी कर्मचाऱ्यांकडून योजनेतंर्गत जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मृत घोषित दाखवण्याची घोडचूक झाली आहे. या घोडचूकीमुळे शेतकर्यांच्या खात्यावर पैसे येणे बंद झाले आहे. मागील वर्षी या घडलेल्या प्रकाराबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती. मात्र या तक्रारीला सरकारकडून गांभीर्याने घेण्यात आले नाही. यासंदर्भात शेलोडी गावातील काही शेतकर्यांनी याबाबत आवाज उठवत चूक दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन पत्र सादर केले होते. पंरतु त्याचा ही काही उपयोगी झाला नाही.

दरम्यान सरकार या गंभीर प्रकरणाकडे सतत दुलर्क्ष करत असल्यामुळे शेलोडी गावातील शेतकर्यांनी तिरडी आंदोलन पुकारले आहे. काँग्रेसचे नेते राम डहाके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये गावातील अनेक शेतकरी सहभागी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सरकार विरोधात घोषणाबाजी करत सध्या हे आंदोलन गावात सुरु आहे. जर सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर आम्ही शेवटपर्यंत हे आंदोलन असेच सुरु ठेवू असा इशारा देखील राम डहाके यांनी दिला आहे.