PM Kisan Yojana | केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत बऱ्याच दिवसांपासून अटकळ होती, की सरकार या योजनेतील रक्कम वाढवू शकते. मात्र, आता यासंदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे.
पीएम किसानची रक्कम वाढणार?
सरकारने संसदेत सांगितले की, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम वार्षिक ६,००० वरून १२,००० रुपये करण्याचा कोणताही विचार नाही. केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, सरकार या योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार करत नाही किंवा महिला शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ देण्याचा विचार करत नाही.
हेही वाचा – Success Story | MBA पास तरुणाने नोकरीऐवजी केली शेतीची निवड, महिन्याला कमावतोय लाखो रुपये
लोकसभेत सरकारला विचारण्यात आले की, या योजनेतील वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे का? त्यावर मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.
11 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला | PM Kisan Yojana
याशिवाय या योजनेच्या प्रगतीवरही कृषीमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले की, “या योजनेंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपयांची रक्कम सरकारने पाठवली आहे. त्यांनी असेही सांगितले की, प्रधानमंत्री किसान योजना ही जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना आहे.” ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमुळे मध्यस्थांना मागे टाकून त्यांना थेट लाभ मिळवून देणे सोपे झाले आहे. तर, दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, यूपीमध्ये आतापर्यंत 2,62,45,829 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.”
रक्कम थेट बँक खात्यात येते
2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरीत केली जाते. जे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाते. म्हणजेच ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.