शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पीएम किसान योजनेसंबंधी ‘हे’ काम आजच पूर्ण करा अन्यथा 15 वा हप्ता येणार नाही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्ह्णून PM किसान योजना सुरु केली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आणि आता 15 वा हप्ता येणार आहे. अशा वेळी जर तुम्हाला यापुढे असाच लाभ घ्याचा असेल तर तुम्हाला बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

यासाठी तुम्ही लवकरात लवकर सरकारी पोर्टलवर जाऊन हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी जोडलेली आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.

दरम्यान, लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने सांगितले की, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर 15 वा हप्ता तुमच्या खात्यात आला नसेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर बँक खाते लिंक केले पाहिजे.

ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी जोडलेली नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता तुम्ही बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घ्या.

बँक खाते आधारशी कसे लिंक करावे?

स्टेप 1 – सर्वप्रथम, तुमच्या डेबिट कार्डसह जवळच्या एटीएममध्ये जा आणि मशीनमध्ये डेबिट कार्ड घाला.

स्टेप 2 – आता तुम्हाला तुमच्या एटीएमचा पिन टाकावा लागेल.

स्टेप 3 – येथे तुम्हाला सर्व्हिस ऑप्शनमध्ये अनेक मेनू दिसतील.

स्टेप 4 – येथे तुम्हाला आधार नोंदणी पर्याय निवडावा लागेल.

स्टेप 5 – यानंतर तुम्हाला खाते प्रकार, आधार क्रमांक टाकावा लागेल आणि ‘ओके’ बटणावर क्लिक करावे लागेल.

काही वेळानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यासह नोंदणीकृत मोबाइलवर एक सत्यापन संदेश प्राप्त होईल, जो बँक खाते आधारशी लिंक करण्याविषयी माहिती देईल.

16 व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू झाली

पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकला नसेल तर तुम्ही अधिकृत पोर्टलवरून या योजनेसाठी नोंदणी करू शकता. पीएम किसान योजना नोंदणीसाठी ऑनलाइन प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पीएम किसान योजना हेल्पलाइन

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, शेतकरी 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर कॉल करू शकतात.