PM Kusum Yojana | पीएम कुसुम योजनेअंतर्गत मिळणार 60 % सबसिडी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kusum Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी. त्याचप्रमाणे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती करता यावी. यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना (PM Kusum Yojana) आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काम देखील चालू आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. पंप व्यापारी यांच्याशी संपर्क साधू शकतात. या आधी सरकारने सोलार टॉप योजना सुरू केली होती यामुळे घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देखील पोहोचले होते.

किती सबसिडी मिळणार? | PM Kusum Yojana

या प्रकल्पामध्ये सौर ऊर्जा पंप निवडीपासून ते त्यांच्या वापरापर्यंत मदत करण्यात येणार आहे. याची चाचणी प्राथमिक पातळीवर देखील सुरू आहे. यामध्ये सौर ऊर्जा पंप खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून 30% सबसिडी आणि राज्य सरकारकडून 30 टक्के सबसिडी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

योजनेचा उद्देश

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि कृषी क्षेत्रात सिंचन स्त्रोत उपलब्ध व्हावे. यासाठी ही पंतप्रधान कुसुम योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. परंतु अजूनही प्राथमिक अवस्थेत यात काम चालू होते. हाती आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेच्या काही भागांमध्ये सुधारणांची गरज आहे. परंतु काही दिवसातच ही योजना शेतकऱ्यांना मिळणार आहे.