PM Matrutv Vandana Scheme | काय आहे सरकारची मातृत्व वंदना योजना? गरोदर महिलांना मिळतात 6 हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Matrutv Vandana Scheme | सरकार हे सामान्य नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. ज्याचा सगळ्यांना फायदा होत असतो. भारत सरकार हा नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना आणत असतात. अशातच आता महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना. सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व योजनेमध्ये (PM Matrutv Vandana Scheme) सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करत असतात.

सरकारच्या या प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत (PM Matrutv Vandana Scheme) गरोदर महिलांना सरकारकडून 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. अनेकवेळा गर्भवती महिलांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे होणारे बाळ देखील कुपोषित होते. त्याला अनेक आजार होतात. त्यामुळे बाळाच्या आणि महिलेच्या आरोग्याची काळजी घेतली जावी. यासाठी ही आर्थिक मदत केली जाते. गर्भवती महिलेला आणि बाळाला सुदृढ आणि चांगले पोषण मिळावे. म्हणून भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

1 जानेवारी 2017 रोजी भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या मातृत्व वंदना योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 19 पेक्षा जास्त असावे लागते. यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जातात. त्यानंतर दोन टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात. या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.