मोदींनी प्रसिद्ध केली श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिराची जोरदार चर्चा आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन होणार असून त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे (Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir ) प्रसिद्ध केली आहेत. मोदींनी एकूण 6 तिकिटे दाखवली आहेत. यामध्ये राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माता शबरीच्या तिकिटांचा समावेश आहे. या तिकिटांच्या डिझाईनकडे बघायचं झाल्यास यामध्ये राम मंदिर, चौपई ‘मंगल भवन अमंगल हरी’, सूर्या, सरयू नदी आणि मंदिराच्या आसपासच्या शिल्पांचा समावेश दिसतोय .

श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे जारी करताना मोदींनी म्हंटल कि, आज श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित ६ टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. तसंच, जगभरात श्रीरामावर आधारित असणाऱ्या सर्व टपाल तिकिटांचा एक अल्बम प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निमित्ताने मी देशातील सर्व नागरिकांचं आणि जगभरातील राम भक्तांचं अभिनंदन करतो. हे टपाल तिकीट पुढील पिढीपर्यंत कल्पना, इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पोहोचवण्याचे एक माध्यम आहे असेही मोदींनी म्हंटल.

मोदी पुढे म्हणाले, जेव्हा कोणी व्यक्ती टपालच्या माध्यमातून पत्र पाठवतो तेव्हा तो इतिहासाचा एक भाग पत्राद्वारे इतरांपर्यंत पोचवतो. पत्र म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नसतो तर इतिहासाच्या पुस्तकांमधील फॉर्म आणि ऐतिहासिक क्षणांचे एक लहान रूप असत. टपाल विभागाला संतांचे मार्गदर्शन लाभले. टपाल तिकिटे कल्पना आणि ऐतिहासिक क्षण कॅप्चर करतात आणि पुढच्या पिढीला संदेश देतात असं म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोदींनी लाँच केलेल्या या टपाल तिकिटात राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माता शबरीच्या तिकिटांचा समावेश आहे. तसेच आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि पाणी या पंचमहाभूतांचे चित्रण देखील या तिकिटांवर करण्यात आले आहेत. याशिवाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या या 48 पानांच्या या पुस्तकात अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि संयुक्त राष्ट्र यांसारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांचा समावेश आहे.