पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र; विविध योजना आणि धोरणात्मक निर्णयांचा पाढाच वाचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा (Lok Sabha Election 2024) जाहीर करणार आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी मतदान होईल हे आज समजणार आहे, त्यामुळे देशभरातील मतदारांचे डोळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे असतील. मात्र तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आत्तापर्यंत मोदी सरकारने राबवलेल्या योजना आणि धोरनात्मक निर्णयाचा उल्लेख मोदींनी केला आहे. तसेच पुढील भविष्यासाठी देशातील नागरिकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

आपल्या पत्राची सुरुवात करताना पीएम मोदी म्हणाले, “माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्यांनो, तुम्ही आणि मी एकत्र एक दशक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहोत. 140 कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे मला प्रेरणा मिळते. लोकांच्या आयुष्यात आलेला बदल हि गेल्या 10 वर्षातील आमच्या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे. हे परिवर्तनकारी परिणाम गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी दृढनिश्चयी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे परिणाम आहेत.”

मोदींनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, “प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे पक्की घरे, सर्वांसाठी वीज, पाणी आणि एलपीजीची सुविधा, आयुष्मान भारतद्वारे मोफत वैद्यकीय उपचार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, मातृ वंदना योजनेद्वारे महिलांना मदत आणि बरेच काही… तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच हे प्रयत्न शक्य झाले आहेत. आपला देश परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींना एकत्र घेऊन पुढे जात आहे. गेल्या दशकात पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व बांधकाम झाले आहे, तर आपला समृद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारसाही पुनरुज्जीवित झाला आहे. आज प्रत्येक नागरिक देश पुढे जात असतानाच आपली समृद्ध संस्कृतीही साजरी करत असल्याचा अभिमान आहे.

तुमच्या विश्वासाचा आणि पाठिंब्याचा परिणाम आहे की आम्ही GST , कलम 370 हटवणे, तिहेरी तलाकवरील नवीन कायदा, संसदेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी नारी शक्ती वंदन कायदा, संसद भवनाचे उद्घाटन, दहशतवाद विरोधात अंमलबजावणी करू शकलो. अनेक ऐतिहासिक आणि मोठ्या निर्णयांसारखी ठोस पावले उचलली. पीएम मोदी म्हणाले की, “जनभागीदारी किंवा लोकसहभागात लोकशाहीचे सौंदर्य आहे. तुमच्या पाठिंब्यानेच मला देशाच्या कल्याणासाठी धाडसी निर्णय घेण्यास, महत्त्वाकांक्षी योजना बनवण्यास आणि त्यांची सुरळीत अंमलबजावणी करण्यास प्रचंड बळ मिळते. मला तुमच्या कल्पना, सूचना आणि पाठिंब्याची गरज आहे कारण आम्ही विकसित भारत घडवण्याचा आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत आणि खरोखर तुमची वाट पाहत आहोत. मला विश्वास आहे की आपण एकत्र येऊन आपल्या देशाला नवीन उंचीवर नेऊ. तुमच्या उज्वल भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.”