मोदींचा अनोखा अंदाज! दिव्यांग कार्यकर्त्यासोबत काढला Selfie

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची ख्याती फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. भारतात तर लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोदींचे फॅन आहेत. मोदींसोबत फोटो काढावा असं तर प्रत्येकाला वाटतच असेल परंतु खुद्द मोदींनीच स्वतःहून एका दिव्यांग व्यक्तीसोबत सेल्फी काढून आपला अनोखा अंदाज दाखवला. मोदींच्या या कृतीने पुन्हा एकदा जनतेची मने जिंकली आहेत.

नरेंद्र मोदी यांनी काल चेन्नईमध्ये अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले. तसेच चेन्नई ते कोईम्बतूर या नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवी झेंडा दाखवला. यावेळी मोदींनी एका दिव्यांग भाजप कार्यकर्त्यासोबत सेल्फी घेतला आणि आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. त्यामध्ये त्यांनी म्हंटल, एक खास सेल्फी… चेन्नईमध्ये मी थिरू एस. मणिकंदन यांना भेटलो. ते नक्कीच अभिमानास्पद आहेत. थिरू एस. मणिकंदन हे तमिळनाडू भाजपचे इरोड येथील कार्यकर्ता असून ते बूथ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. एक अपंग व्यक्ती, ती स्वतःचे दुकान चालवते आणि सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे – तो आपल्या दैनंदिन नफ्यातील मोठा हिस्सा भाजपाला देतो! असं ट्विट मोदींनी केलं.

ते पुढे म्हणाले, अशा पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान वाटतो, जिथे आमच्याकडे तिरू एस. मणिकंदन यांच्यासारखी माणसे आहेत. तिरू एस. मणिकंदन यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे आणि आमच्या पक्षाशी आणि आमच्या विचारधारेशी असलेली बांधिलकी सुद्धा तितकीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा