कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या बंधूंच्या कारला भीषण अपघात

0
275
accident to Prime Minister Modi's brother's car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना कर्नाटक येथील मैसूर येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना म्हैसूर येथील जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद दामोदर मोदी हे कारणे निघाले होते. त्यांची कार कर्नाटकातील म्हैसूरजवळ आली असता त्या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच म्हैसूरच्या एसपी सीमा लाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही या अपघाताची माहिती कळवली आहे.

कारमधून प्रल्हाद दामोदरदास मोदी, त्यांचा मुलगा, सून आणि नातू प्रवास करत होते. सर्व जखमी असून, त्यांना म्हैसूर येथील जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोदींच्या भावाच्या चेहऱ्याला दुखापत, सुनेच्या डोक्याला, नातवाच्या पायाला दुखापत झाली आहे. मुलगा आणि चालक सत्यनारायण यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.