पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण; मुख्यमंत्री शिंदेंना जवळ घेत पाठीवर मारली कौतुकाची थाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्रातील नागपुरात असलेल्या सुमारे 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी झिरो माईल ते वायफळ टोलनाका असा 10 किमी अंतराचा प्रवास करून वायफळ टोलनाक्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी तिकीट काढून मेट्रोमधून प्रवास केला. या ठिकाणी त्यांच्या हस्ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -1’ चे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान त्यांच्या हस्ते ‘नागपूर मेट्रो टप्पा – 2’ ची पायाभरणी करण्यात आली. 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील विकासात आणखी एक भर पडली आहे.

मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हा महामार्ग आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

समृद्धी महामार्गाचे वैशिष्ठ म्हणजे 701 किलो मीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग असून समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा 17 तासांवरून हे अंतर 7 तासांवर येणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी 11 लाख वृक्ष असणार आहे. तर राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे.

ढोल वाजण्याचाही घेतला आनंद

पंतप्रधान मोदी यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशाचे पथक आणण्यात आले होते. या पथकाच्या मार्फत त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांचा आवाज कानी पडताच पंतप्रधान मोदी त्याच्या दिशेने गेले. त्यांनी कौतुकाने ढोल ताशाची माहिती घेतली तसेच त्यांनी हातात दांडी घेत ढोल वाजवले.