PM Surya Ghar Scheme | आपले केंद्र सरकार हे सर्व सामान्य लोकांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहेत. त्या अंतर्गत सर्वसामान्य लोकांना नेहमीच फायदा होत असतो. सामान्य लोकांचे जीवनमान उंचवावे त्याचप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टींचा लाभ घेता यावा. यासाठी केंद्र सरकारने अगदी खेडोपाडी देखील नवीन योजना सुरू केल्या आहेत. नुकतेच केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लोकांना दर महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज वापरण्याची तरतूद केलेली आहे. सरकारने ही नवीन योजना आणलेले आहे या योजनेचे नाव पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Scheme) असे आहे.
या योजनेअंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जे लोक रुफटॉप सोलर सिस्टिम बसवणार आहेत. त्यांना सरकारकडून सबसिडी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांपर्यंतचा अनुदान सरकारकडून मिळणार आहे.
पीएम सूर्य घर वीज योजना
सरकारच्या या नवीन पीएम सूर्य घर मोफत वीज (PM Surya Ghar Scheme) योजनेअंतर्गत एक किलो वॅट रूफटॉप सोलर सिस्टिम जे व्यक्ती बसवतील त्यांना सरकारकडून 30 हजार रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे जे लोक दोन किलो वॅट रूफटॉप बसतील त्यांना 60 हजार रुपये दिले जातील. तर 3 किलो वॅट रूफटॉप सोलर सिस्टिम बसवणाऱ्या व्यक्तीला 78 हजार रुपये ही सबसिडी मिळेल. परंतु आता अनेकांना प्रश्न पडला आहे की ही सबसिडी नक्कीच मिळणार कशी? तर याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सबसिडी कशी मिळणार ? | PM Surya Ghar Scheme
- पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचे राज्य, वीज वितरण कंपनी त्यानंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.
- त्यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक या सगळ्या गोष्टी जोडून तुम्हाला लॉगिन लॉगिन करून फॉर्म नुसार सोलरसाठी अर्ज करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला रुफटॉप सोलर बसवण्यासाठी मंजुरी मिळेल.
- त्यानंतर तुम्हाला कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करावा लागेल.
- प्लांट्स स्थापित झाल्यानंतर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्लांट तपशील तुम्ही सबमिट करा आणि नेट मीटरसाठी पुढील अर्ज करा.
- हा नेट मीटर बसवल्यानंतर डिस्कोमद्वारे तुमची पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल आणि पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- हे कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर तुम्हाला बँक खात्याचे तपशील, रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल आणि त्यानंतर 30 दिवसांच्या आहात तुमच्या खात्यामध्ये तुमची सबसिडी येऊन जाईल.
या योजनेसाठी सरकारला किती खर्च येणार आहे
या योजनेअंतर्गत जवळपास 1 कोटी कुटुंबीयांना लाभ मिळणार आहे या संपूर्ण प्रकल्पा अंतर्गत सरकार एकूण 75, 021 कोटी रुपये खर्च करणार आहेत.