PM Surya Ghar Yojana | सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळणार 300 युनिटपर्यंत मोफत वीज, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Surya Ghar Yojana | आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सामान्य जनतेसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून त्यांचे कष्ट कमी होतील आणि त्यांना इतर सगळ्यांचा देखील वापर करता येईल. सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील अशा काही योजना अमलात आणून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पॅनल तसेच सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी अनुदान दिलेली आहे.

यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पंतप्रधान कुसुम योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत सौर उर्जेवर इलेक्ट्रिक पंप बसवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध आहे.

सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान जाहीर केलेले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर किसान योजना (PM Surya Ghar Yojana) देखील जाहीर केली आहे. सरकारच्या या नव्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता 2 किलो वॅट सोलर पॅनल सिस्टीम बसवण्याकरता जेवढा खर्च होईल त्याच्यासाठी 60 टक्के सबसिडी आणि 2 ते 3किलो वॅट पर्यंत क्षमतेच्या सोलर सिस्टिमवर एकूण खर्चाच्या 40% सबसिडी देण्यात येणार आहेत.

सरकारच्या या नवीन योजनेच्या माध्यमातून 1 किलोवॅट क्षमतेचे सोलार सिस्टिम बसवण्यासाठी कमीत कमी 30 हजार रुपये अनुदान मिळते. तसेच 2 किलो बसवण्यासाठी 60 हजार रुपये अनुदान सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत आहे.

पीएम सूर्य घर योजना योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

सरकारच्या या नवीन पीएम सूर्य घर योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर तुमची नोंदणी करावी लागेल. ज्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे राज्य त्यानंतर वीज वितरण कंपनी या सगळ्याची निवड करायची आहे त्यानंतर पुढे प्रक्रिया करावी लागणार आहे.
त्यानंतर पुढे वीज ग्राहकाचा क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी हे सगळे भरून तुम्हाला लॉगिन करायचे आहे.

योजनेचा लाभ कसा मिळवायचा? | PM Surya Ghar Yojana

या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळणार आहे. त्यांची यादी पोर्टलवर देण्यात आलेली आहे येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सौर प्रणाली तसेच तिचे फायदे त्याचप्रमाणे विक्रेता रेटिंग यांची माहिती पोर्टलवर देण्यात आलेली आहे. तुम्ही सोलार सिस्टिम बसवल्यानंतर ग्राहकाला त्या प्लांटची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

त्यानंतर नेट मीटर साठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. हे नेट मीटर बसवल्यानंतर डिस्कोमद्वारे तपासणी होईल. आणि त्यानंतर पोर्टलवर एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. त्यानंतर तुम्हाला या पोर्टल द्वारे बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. आणि रद्द केलेला चेक सादर करावा लागेल. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यामध्ये सरकारकडून येणाऱ्या अनुदान जमा होईल.