PM Surya Ghar Yojana | घरबसल्या कसा करायचा पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Surya Ghar Yojana | मोदी सरकार हे देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. त्याचा फायदा नागरिकांना देखील होत असतो. नागरिकांच्या प्रत्येक बाजूचा विचार करून सरकार निर्णय घेते. अशातच आता पण केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्य घर (PM Surya Ghar Yojana) योजनेची घोषणा केलेली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता देशभरातील ग्राहकांचा वीज बिलाचा ताण कमी होणार आहे. नागरिकांची आर्थिक बचत करण्यासाठी त्याचप्रमाणे पारंपारिक ऊर्जा स्त्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

सरकारने या योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलार बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे. आता या योजनेचा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कशाप्रकारे करायचा? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? पात्रता काय असणार आहे? याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा अर्ज भरण्यासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही.

सूर्यघर योजना काय आहे ? | PM Surya Ghar Yojana

आजकाल सर्वत्र विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे नागरिकांना वीज बिल देखील जास्त येते. या गोष्टी लक्षात घेऊन जाता लोकांना पारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे महत्त्व समजावे यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजना आणली आहे. अनेक गरीब लोकांना आर्थिक अडचणीमुळे वीज बिल भरणे शक्य होत नाही. परंतु ते लोक विजेपासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरामध्ये सोलर पॅनल उपलब्ध करून देणारे येणार आहेत.

सरकारने आणलेल्या या योजनेअंतर्गत 1किलो वॅट रुफटॉप सोलर सिस्टिमसाठी 30000 रुपयांच्या अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे 2 किलो वॅट रुफटॉप सोलर सिस्टिम साठी 60000 रुपये आणि 3किलो स्टॉप सोलर सिस्टमसाठी 78 हजार रुपयांचे अनुदान सरकारकडून मिळणार आहे.

या योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय असला पाहिजे.
  • सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या लोकांचे उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आवश्यक कागदपत्र

  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • विज बिल
  • रहिवासी दाखला
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या (PM Surya Ghar Yojana) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर होम पेजवर अप्लाय फॉर रूफ टॉप सोलार या टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • ज्यामध्ये राज्य, जिल्हा, वीज वितरण, कंपनी वीज, ग्राहक क्रमांक टाका आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर आलेल्या नवीन पेजवर नोंदणी अर्जाचा नमुना येईल त्यावर सगळे आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्र अपलोड करा.
  • शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा आणि तुमचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.