PM Swanidhi Yojana 2024 | केवळ आधार कार्ड देऊन मिळणार 50 हजार रुपये, ‘ही’ आहे सरकारची नवी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Swanidhi Yojana 2024 | गरीब आणि गरजू कुटुंबासाठी सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत. जेणेकरून गरजू लोकांचा देखील सर्वांगीण विकास होईल. तसेच गरीब जनतेला देखील सगळ्या सुख सुविधा मिळतील. या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थर्य देण्याचे काम सरकार करत असते. Covid -19 च्या संकटाच्या काळातच मोदी सरकारने ही एक नवीन योजना चालू केली. ती सध्या खूप लोकप्रिय होत चालली आहे.

सरकारच्या या योजनेअंतर्गत गरजूंना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. कोणत्याही हमीशिवाय हे कर्ज दिले जाते. ही योजना जे व्यवसायिक आहेत त्यांना एखादा लहान व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी आहे. सरकारच्या या योजनेचे नाव पंतप्रधान स्वानिधी योजना (PM Swanidhi Yojana 2024) असे आहे.

सरकारची ही नवी योजना खास करून रस्त्यावर जे लोक व्यवसाय करतात अशा विक्रेत्यांसाठी आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने ही नवीन पीएम स्वानिधी योजना (PM Swanidhi Yojana 2024) सुरू केली आहे. परंतु या योजनेचे यश पाहून आता सरकारने ही योजना वाढवली आहे.

या योजनेअंतर्गत नागरिकांना सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत असते. रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करणारे लोक हे सरकारच्या या योजनेतून कर्ज घेऊ शकतात. त्यांचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज मिळते. भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फास्ट फूडची छोटी दुकाने चालवणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो.

50 हजार रुपयांचे कर्ज कसे मिळेल? | PM Swanidhi Yojana 2024

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.
  • त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्र जोडावी लागतील.
  • त्या फॉर्म सोबत सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तुमचा फॉर्म बँकेत जमा करावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची आणि फॉर्मची चौकशी होईल आणि त्यानंतरच तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाईल.

महत्त्वाची कागदपत्र

  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • तुम्ही करत असलेल्या कामाची माहिती
  • पॅन कार्ड
  • बँकेचे बचत खाते
  • उत्पन्नाचा स्त्रोत

लहान व्यावसायिक लाभ घेऊ शकतात | PM Swanidhi Yojana 2024

  • केंद्र सरकार देशातील अल्पभूधारक आणि गरजू लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ कोणताही लहान व्यवसाय करणारा व्यक्ती घेऊ शकतो.
  • या स्वानिधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते.
  • 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासहर्ता आधी निर्माण करावी लागेल.
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला सुरुवातीला 10 हजार रुपयांचे कर्ज मिळेल
  • एकदा या कर्जाची रक्कम परतफेड केली की त्याच्या दुप्पट तुम्हाला दुसऱ्यांदा कर्ज मिळेल.

हमी आवश्यक नाही

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी आवश्यक नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जाची रक्कम 3 वेळा तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. रस्त्यावरील विक्रेत्यासाठी कॅश बँक सह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेमध्ये आता वाढ केली आहे या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे.