PMPL : मुंबईनंतर झपाट्याने विकसित होणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर म्हणजे ‘पुणे’. शैक्षणीक, सांस्कृतिक आणि नोकरीसाठी सुद्धा पुण्याला मोठी पसंती आहे. शिवाय उत्तम रहिवासी ठिकाण म्हणून पुणे देशभर प्रचलित आहे.
अशा या पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे बस. मात्र अनेकदा बसची ताटकळत वाट पाहावी लागते, नवख्या माणसाला बस रूट आणि वेळा माहिती नसतात . पण आता PMPL ने प्रवास करायचा म्हणजे नो टेन्शन कारण PMPL कडून नवे ॲप लॉन्च करण्यात आले असून यामुळे PMPL चा प्रवास सुखकर होणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएल (PMPL) कडून पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PMPL कडून एक ॲप विकसित करण्यात आलं असून या ॲपमुळे पुणेकरांची मोठी सोय होणार आहे. या ॲप मध्ये असं काय आहे? तर या ॲप मध्ये सर्व बसेस संदर्भात शिवाय मेट्रोच्या तिकिटाची सुद्धा सुविधा मिळणार आहे. उद्यापासून म्हणजे येत्या 17 ऑगस्ट पासून हे ॲप सुरू होणार आहे. चला जाणून घेऊया याबद्दल…
मागच्या अनेक दिवसांपासून या ॲपची चर्चा होती. असं हे ‘आपली पीएमपीएल ‘ हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे. पुणेकरांना 17 ऑगस्ट पासून म्हणजेच उद्यापासून अँड्रॉइड डिव्हाइस वर या ॲपची सेवा सुरू करता येणार आहे.
‘या’ सुविधांचा समावेश (PMPL)
- हे ॲप वापर करताना त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंतच्या सर्व बसमार्गांची माहिती देईल.
- याबरोबरच या ॲपमध्ये मेट्रोचं तिकीट सुद्धा बुक करता येणार आहे.
- या ॲपमध्ये लाईव्ह लोकेशनचे फीचर असणार आहे
- याशिवाय ऑनलाइन तिकीट बुकिंग
- यूपीआय पेमेंट सुद्धा या ॲपवरून करता येणार आहे.
दरम्यान पुणे मेट्रोला पुणेकरांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. पुणेकरांना (PMPL) आता स्वारगेट पर्यंत मेट्रो कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र लवकरच सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतचा मेट्रोच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्ण होणार असून लवकरच पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनाही स्वारगेट पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.