PMPML Bus Ticket Hike : पुणेकरांना मोठा झटका!! PMPML बसचे तिकीट महागले

PMPML Bus Ticket Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PMPML Bus Ticket Hike । पुणेकरांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. पुण्याची शान असलेल्या PMPML बस च्या तिकिटात मोठी वाढ करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बससेवेचा दरात येत्या १ जून पासून वाढ होणार आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळ आणि प्रादेशिक वाहतूक प्राधिकरण (आरटीए), पुणे यांनी नवीन भाडे स्लॅब आणि प्रवास पासेसना मान्यता दिली आहे.विशेष म्हणजे तब्बल १० वर्षानंतर पीएमपीएमएलच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

राज्य परिवहन मंडळ, बेस्ट तसेच नागपूर शहर बससेवा यांनी केलेल्या तिकिट दरवाढीच्या आधारावर पीएमपीने नव्याने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. पगार, सीएनजी, डिझेल आणि बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून तिकीट दरवाढीसंदर्भात चर्चा होती. अखेर पीएमपीने तिकीट दरात वाढ (PMPML Bus Ticket Hike) करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीएमएलने प्रवासात सुसूत्रता येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला आहे. ५ ते १० किमी अंतरावर आधारित ११ स्टेज निश्चित केल्या आहेत. या रचनेनुसार १ किमी ते ८० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत.

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठीच्या पास दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘पीएमआरडीए’च्या मासिक पासचा दरही कायम आहे.. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी एकीकृत दैनिक पासची किंमत आता ७० रुपयेच असेल आणि मासिक पासची किंमत १५००रुपये असेल.

नवीन दर असे असतील- PMPML Bus Ticket Hike

प्रवासाचे एकूण ११ टप्पे
एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी दर पाच किलोमीटर अंतराने सहा टप्पे
३० ते ८० किलोमीटरसाठी दहा किलोमीटर अंतराने पाच टप्पे
५ किमीपर्यंतसाठी १० रुपये
५.१ ते १० किमी २० रुपये
१०.१ ते १५ किमी ३० रुपये
१५.१ ते २० किमी ४० रुपये