पुण्यातील प्रवाशांच्या सुरक्षा आणि आरामदायी प्रवासासाठी PMPML प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील एका घटनेनंतर ज्या ठिकाणी ई-शिवनेरी बसचा चालक आयपीएल सामना पाहताना आढळला, त्यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेला गंभीरपणे घेत, PMPML ने आता सर्व चालक आणि वाहकांसाठी नवीन आणि कडक नियमानुसार कार्यवाही सुरू केली आहे.
प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध
नवीन नियमानुसार, बस चालवताना मोबाईल फोन वापरणे, हेडफोन लावणे, तंबाखू किंवा पानमसाला खाणे यांसारख्या कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संबंधित चालक किंवा वाहकाला दोन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास PMPML प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कुठे कराल तक्रार ?
प्रवाशांना आता अधिक अधिकार दिले गेले आहेत. जर कोणताही PMPML कर्मचारी नियम तोडताना दिसला, तर प्रवासी त्यांच्याविरोधात त्वरित तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर 9881495589 वर तक्रार नोंदवली जाऊ शकते, आणि फोटो, व्हिडिओ किंवा अन्य पुरावे जोडल्यास त्वरित कारवाई केली जाईल.
या निर्णयामुळे चालकांचे अनुशासन निश्चितपणे वाढेल, आणि अपघातांच्या संभाव्य घटनांमध्ये घट होईल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.