रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले.

आयसीआयसीआय बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की बाह्य बेंचमार्क कर्ज दर (I-EBLR) रिझर्व्ह बँकेच्या वाढीव रेपो दराच्या अनुषंगाने करण्यात आला आहे. ICICI बँकेने सांगितले की I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के करण्यात आला आहे. नवीन दर 5 ऑगस्ट 2022 पासून लागू झाला आहे. त्यामुळे आता कर्जे महाग होणार आहेत. EBLR हा व्याजदर आहे ज्याच्या खाली बँका कर्ज देण्यास परवानगी देत ​​नाहीत.

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेपो लिंक्ड कर्ज दर 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. नवीन दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू होतील. बँकांच्या कर्जाचे दर हे रेपो रेट वर अवलंबून असतात. रेपो रेट वाढला तर कर्जावरील व्याजदरात बँकाकडून वाढ केली जाते.