जबरदस्त! 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास फक्त 1 रुपयात मिळेल बाईक; कुठे चाललीये ही ऑफर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्हाला जर कोणी अवघ्या एक रुपयांमध्ये बाईक दिली तर कसे वाटेल? तुम्ही म्हणतात ही कोणती अफवा आहे, परंतु नाही अवघ्या एक रुपयात बाईक खरेदी करण्याची संधी तुम्हाला Poco X6 Neo 5G फोन देत आहे. Poco X6 Neo 5G फोन तुम्हाला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकतो. आज हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर याची पहिली विक्री 7 वाजता सुरू करण्यात येईल. जो कोणता व्यक्ती आज हा फोन खरेदी करेल त्यातील 5 भाग्यवान खरेदीदारांना फोनसह फक्त 1 रुपयात महागडी बाईक खरेदी करता येईल. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करा.

स्मार्टफोनवर आहे खास ऑफर

आज तुम्ही जर Poco X6 Neo 5G फोन खरेदी केला तरी यासह तुम्हाला एक रुपयात Hero Xtreme ही खरेदी करता येऊ शकते. हा स्मार्टफोन तुम्हाला Astral Black, Horizon Blue आणि Martian Orange अशा तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. परंतु अद्यापही या स्मार्टफोनची किंमत किती असू शकते हे समोर आलेले नाही. खास म्हणजे, हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला बाईक देखील मिळू शकते. तसेच, लाइव्ह सेलमध्ये काहींना मोफत फोन देखील दिले जाऊ शकतात. हा फोन खरेदी करणाऱ्यांपैकी तुम्ही पाच भाग्यवान व्यक्तींमध्ये आला तर तुम्हाला 1 रुपया देऊन बाईक खरेदी करता येऊ शकते.

Poco X6 Neo 5G

या फोनमध्ये तुम्हाला 108-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येत आहे. यासह फोनमध्ये तुम्हाला OLED डिस्प्ले मिळेल. या फोनची जाडी फक्त 7.69mm इतकी आहे. हा फोन Redmi Note 13 Pro 5G चे रीब्रँडेड व्हर्जन आहे. यात तुम्हालाडायमेंशन 6080, HD+ रिझोल्यूशन, 6.67-इंच AMOLED डिस्प्ले मिळेल. या फोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा देखील 16-मेगापिक्सलचा आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक असेल. अशा अनेक कारणांसाठी हा फोन तुमच्यासाठी स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम पर्याय ठरेल.