तलाठ्याने घेतली 5 हजारांची लाच, पण पोलिसांना समोर पाहताच पैसे गिळले (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांच्याकडून लाज घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मध्य प्रदेशातील कडनी या गावात देखील अशीच घटना घडली आहे. याठिकाणी गावातील एका तलाठयाने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच घेतली खरी परंतु आपल्यासाठी रचलेला हा सापळा आहे हे लक्षात येताच सदर तलाठ्याने ते पैसे चक्क तोंडात टाकून खाल्ली. याबाबतचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सातबारा उतारा मोबाईलवर डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती?

आता सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भूनकाशा आदी सरकारी कागदपत्र आता एकाच मोबाईल अँपवरून मिळवता येऊ लागली आहेत. अगदी तुम्ही तुमची जमीनसुद्धा या अँपवरून सहज मोजू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल. यामध्ये रोजचे बाजारभाव, सरकारी योजना, हवामान अंदाज यांचीही माहिती मोफत दिली जाते. तेव्हा आजच Hello Krushi अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, तलाठ्याला लाच घेताना पकडण्यासाठी हा सापळा पोलिसांनी रचला होता. मात्र हा सापळा आपल्यासाठीच रचण्यात आल्याची माहिती तलाठ्याला समजताच त्याने लाच म्हणून घेतलेले पैसे खाऊन टाकले. यानंतर तलाठ्याला लगेच जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तलाठ्याने खावून टाकलेली रक्कम बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाची सर्व माहिती देताना एसपी संजय साहू यांनी सांगितले की, बारखेडा गावातील एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की कडनी गावातील तलाठी आपल्याकडे सरकारी कामासाठी लाच मागत आहे. त्याच्या या तक्रारीनंतरच पोलिसांनी हा सर्व सापळा बसला होता. यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तलाठ्याला ठरवण्यात आलेले रक्कम दिली. मात्र याचवेळी पोलिसांनी सापळा रचल्याची तलाठ्याला लागली. त्यानंतर स्वतःच्या बचावासाठी तलाठ्याने घेतलेली पाच हजार रुपयांची रक्कम खाऊन टाकली. परंतु तोपर्यंत तलाठी पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात अडकला होता.

पोलिसांनी या तलाठ्यावर कायदेशीर कारवाई केली. तसेच त्याच्या पोटातील रक्कम काढण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या सर्व घटनेचा सखोल तपास करीत असून तलाठ्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान तलाठ्याने घेतलेली लाच आणि पोलिसांनी रसलेल्या सापळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच सरकारी कामासाठी बसलेले अधिकारी असे करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाला मदत मागावी असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.