पर्यटकांनो महाबळेश्वर – पाचगणीला जाताय? या मार्गामध्ये झालाय ‘हा’ मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने थंड हवेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला लाखो पर्यटक भेट देत आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे याचा पर्यटकांना नाहक त्रास होतोय. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आजपासून दि. 7 ते 25 जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी प्रायोगिक तत्त्वावर काही बदल सुचवले आहेत.

सुचवण्यात आलेल्या बदलानुसार दि. 7 ते 25 जून दरम्यानच्या दर शुक्रवार, शनिवार व रविवारसाठी वाहतुकीतील बदल असे मुंबई- पुणे बाजुकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहने सुरुर फाटा- वाई- पाचगणी- महाबळेश्वर (एकूण 48 किलोमीटर) कडे जातील. तर पाचगणी बाजुकडून पुणे- मुंबईकडे जाणारी वाहने संजीवन विद्यालय, पाचगणी रुईघर महू डॅम रोडने- करहर- कोळेवाडी- कुडाळ- पाचवड फाटा मार्गे महामार्गावरुन पुढे जातील त्यामुळे थंड हवेची मजा लुटून पुन्हा पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या पर्यटकांना आता पाचगणी, वाई, सुरूर फाटा या मार्गाचा वापर करता येणार नाही. तर महाबळेश्वर बाजूकडून पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या पर्यटकांनी मेढा, कुडाळ- पाचवड फाटा अथवा मेढा- सातारा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

या वाहतूक बदलाबाबत काही हरकती असल्यास [email protected] या संकेतस्थळावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महाबळेश्वर बाजुकडून कोल्हापूर व कोल्हापूर, सातारा बाजुकडून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी मेढा- महाबळेश्वर या मार्गाचा वापर करता येईल. महाबळेश्वर बाजुकडून पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पाचगणी मार्गे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना लिंगमळा भेकवली मार्ग महाबळेश्वर- मेढा रोडवरील लिंगमळा फाटा- मेढा-कुडाळ- पांचवड फाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. या वाहतूक मार्गातील बदलांची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.