Wednesday, February 1, 2023

वाईत दुचाकी जाळून वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला अटक

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई शहरात अज्ञात व्यक्तीने गंगापूरी, रविवारपेठ, घोरपडे हॉस्पीटल, रामडोह आळी परीसरातील रोडवर लावलेल्या 12 चारचाकी गाडयांची तोडफोड केली होती. तर गंगापूरी येथे एक मोटार सायकल जाळली होती. या प्रकरणी वाई पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन युवक व दोन विधिसंघर्षग्रस्त बालके अशा चौघांच्या टोळीला आज ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

वाई शहरात चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांमध्ये विजय मछिंद्र धोत्रे (वय 21, रा. सिध्दनाथ वाडी, वाई), समीर ख्वाजा पठाण (वय 19, रा. सिध्दनाथ वाडी, वाई) आणि 2 विधिसंघर्ष ग्रस्त बालके अशांचा समावेश आहे.

वै शहरात घडलेल्या वाहनाच्या तोडफोडीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उप विभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले. त्यानंतर गुन्हयाचे अनुषंगाने बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेचे सी. सी. टी. व्ही फुटेज ताब्यात घेतले. व त्यातून तपासची चक्रे फिरवली.

गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तपास करत एका आरोपीस ताब्यात घेतले व त्याच्याकडून इतरांची माहिती घेतल्यानंतर त्याच्या तीन साथीदारांना पाचवड, सातारा येथून ताब्यात घेतलेले. त्यांच्यातील 2 विधीसंघर्ष बालक आहेत. संबंधित आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुंह्याची कबुली दिली. तसेच पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाहनांची तोडफोड केल्याची माहिती दिली.