परतवाड्यात सायकल रॅली काढून नवीन वर्षाचं स्वागत; स्वस्थ आरोग्य ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथे नवीन वर्षाचं स्वागत सायकल रॅलीद्वारे करण्यात आले. यावेळी शहरातील परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी जयस्तंभ चौक ते अष्टमहासिद्धी पर्यंत पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सायकल चालवून आपले व इतरांचे आरोग्य स्वस्थ ठेवत नवीन वर्षी भरगोस सायकल चालवा असा संदेश दिला.

धावपळीच्या काळात कुठेतरी लवकर जाण्याच्या हेतूने लोक खाजगी वाहनांचा अधिक वापर करत असतात. जवळच्या अंतरावरील काम असेल तरीही वाहनाचा वापर सर्रास केला जात असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे सायकल चालवण्याचं काम फक्त एका दिवसापुरतं न ठेवता त्याचं दीर्घकालीन अनुसरण करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.

यावेळी परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर,अचलपुरचे उपविभागीय अधिकारी, अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, एसबीएम क्लबचे रूपेश शर्मा संजय वडुरकर, प्रशांत वानखडे, प्रशांत कळमकार, रिंकू शुक्ला विवेक तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.