उड्डाणपूल पाडण्यासाठी पोलिसांची अधिसूचना जारी : कुठे, काय जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात आणि वाहतूकीबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. पुणे- बंगलोर महामार्गावर सहापदरीकरण करताना कराड येथील दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच दि. 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजलेपासून वाहतूक वळविण्यात येणार असून पूल पाडण्याचे काम 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तर उड्डाणपूल तयार करण्यासाठी 20 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

उड्डाणपूल कामामुळे वाहतूकीत बदल पुढीलप्रमाणे असणार आहे. 
1) कोल्हापुर कडुन सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक ढेबेवाडी फाट्यावरील ओव्हरब्रिज कराड बाजुस ज्या ठिकाणी संपतो. तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येणार आहे. 2) कोल्हापुरहून कराडमध्ये येणारी वाहने हि एकेरी वाहतुकीने वारुंजी फाटा पर्यंत येतील तेथुन पुढे
अ) जड वाहतुक हि वारुंजी फाटा येथुन हॉटेल पंकज समोरुन सेवारस्त्यामार्ग महात्मा गांधी
पुतळयासमोरुन कराडमध्ये जाईल.
ब) हलकी वाहतुक हि वारुंजी फाटा येथुन जुना कोयना ब्रिज मार्गे कराडमध्ये जाईल.
3) कराड शहरामधुन कोल्हापुर नाका येथे बाहेर पडणाऱ्या वाहनासाठी
अ) कोल्हापुर बाजुकडे जाण्यासाठी सेवारस्ता मार्गाचा वापर करुन जाता येईल.
ब) कराडमधुन सातारा कडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समोरुन उजवीकडे यु-टर्न घेवुन
नंतर इंडिअन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सर्विसरोडला मिळणार आहेत.
4) सातारा ते कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक हॉटेल पंकज समोरुन पश्चिमेकडील कोल्हापुर सातारा लेनवर वळविण्यात येईल व कोल्हापुर नाक्यावरील ब्रिज संपलेनंतर पुर्वेकडील सेवारस्त्यावर एकेरी मार्गाने घेण्यात येईल. कृष्णा हॉस्पिटल समोरील ब्रिजसंपले नंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.

पुणे- बंगलोर महामार्गावरील हे दोन उड्डाणपूल होणार जमीनदोस्त; काय आहे प्रशासनाचा प्लान ते पहा

5) सातारा कडुन कोल्हापुरकडे (वारूंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापुर कडुन सात्ताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक हि एकेरी वाहतुक असलेने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सदर मार्गावर कोणतेही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
6) कराड बाजुकडुन ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक हि कोल्हापुर नाका ते ढेवेवाडी फाटा पर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावुन ब्रिज खालुन ढेबेवाडीकडे जाईल.
7) ढेबेवाडी बाजुकडुन कराड शहराकडे येणारी वाहतुक हि ढेबेवाडी फाटा येथुन पश्चिमेकडील सेवारस्त्याने वारुंजी फाटा मार्गे कराडमध्ये येईल.
8) जड वाहतुक (ओडीसी वाहने) हि फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
9) कोल्हापुर नाका ते पंकज हॉटेल यामार्गावर असणार भुयारी मार्ग बंद राहील.