Satara News : गुपचुप केली लाखांच्या गांजाची लागवड, अखेर पोलिसांनी टाकली धाड! गांजासह एकास घेतले ताब्यात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बक्कळ पैसा मिळावा म्हणून त्यानं गुपचूप शेतात केली गांजाची लागवड. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकत तब्बल दीड लाख रुपयांचा झाडासह मुद्देमाल जप्त केला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे अंमली पदार्थ विरोधी पथक व पोलिसांनी संयुक्त रीतीने काल शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईत झाडासहीत 11.870 कि. ग्रॅ. वजनाचा 1 लाख 26 हजार 920 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. तर या प्रकरणी सोमनाथ पांडुरंग जाधव (रा. म्होप्रे, ता. कराड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांना माहिती मिळाली की, कराड तालुक्यातील म्होप्रे येथे एकाने गांजाची लागवड केली आहे. गांजाबाबत माहिती मिळाल्यानंतर ठाकूर यांनी याबाबतची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांना दिली. तसेच एक पथक तयार करून ते म्होप्रे येथील बेघर वसाहतीत पाठवले. त्या ठिकाणी पथकाने छापा टाकून सोमनाथ जाधव यांच्या शेतातून गांज्याची झाडे जप्त केली.

यावेळी टाकलेल्या छाप्यात 14. 048 कि.ग्रॅ. वजनाची 5 गांजाची झाडे तसेच आरोपीचे घरातून 0.822 ग्रॅम वजनाचा असा एकुण 11.870 कि. ग्रॅ. वजनाचा 1,26,920/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांना आढळून आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शना खाली अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, पो. नि. विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण पवार, धनजंय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, उत्तम कोळी, गणेश वेदपाठक, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पो. कॉ. अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे, म. पो. कॉ. जयश्री डोईफोडे यांनी केलेली आहे.