Police Recruitment 2024 | पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ; सोमवारपासून होणार मैदानी चाचण्यांना सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Police Recruitment 2024 | यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलीस भरतीची प्रक्रिया मंदावले होती. परंतु आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्याच्या प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता येत्या सोमवारी म्हणजेच 10 जूनपासून शहर आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलीस भरतीसाठीची उमेदवारांची चाचणी परीक्षा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी डिसेंबर महिन्यांपासून उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. परंतु मुदतवाढ करून फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करून घेतले होते. परंतु त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आणि ही भरती प्रक्रिया थांबली.

परंतु या पोलीस भरती (Police Recruitment 2024)संदर्भात शेवटचे नियोजन सुरू झालेले आहे. येता 10 तारखेपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना हॉल तिकीट मेसेज आणि ई-मेल मोबाईलद्वारे कळवलेले आहे. त्यानुसार आता उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.

मैदानी चाचणी | Police Recruitment 2024

धावणे, गोळा फेक, शारीरिक पात्रता मोजणी, पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर तर फुगून 84 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 155 सेंटिमीटर