Police Recruitment 2024 | ‘या’ वर्षी होणार तब्बल एवढ्या पदांची पोलीस भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Police Recruitment 2024 | पोलीस भरतीची जे विद्यार्थी वाट पाहत होते, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण राज्यांमध्ये लवकरच 17441 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी देखील केलेली आहे. पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती होणार आहे. मागील वर्षी पोलीस भरती झाली नाही त्यामुळे तरुण अनेक चिंतेत होते. परंतु आता सगळ्यांचे हे टेन्शन दूर होणार आहे. कारण यावर्षी तब्बल 17 हजार 441 जागांसाठी ही भरती चालू होणार आहे.

ज्यावेळी पोलीस किंवा अन्य कोणत्याही खात्यातील अधिकारी निवृत्त होतात, त्या ठिकाणी नवीन लोकांचे नियुक्ती केली जाते. आणि ही पदभरती दरवर्षी केली जाते असं नाही. मात्र यावर्षी भरपूर जागांची भरती करण्याला सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचे वेळापत्रक अजून समोर आलेलं नाही. परंतु सरकारकडून हे वेळापत्रक आल्यावर भरती सुरू होणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला अर्ज करावा लागतो. त्यानंतर लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा होते.

हेही वाचा – PPf | 417 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवर मिळवा 40,68,000 रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना

Police Recruitment 2024 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची पूर्तता करावी लागते. शैक्षणिक गुणपत्रिका रहिवासी दाखला इतर कागदपत्रे देखील तुम्हाला सादर करावे लागतात. आणि दिलेल्या कालावधीत हा अर्ज करावा लागतो.

सरकारने घोषणा केली की या भरतीला सुरुवात होते. आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिरात येते. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. मग लेखी परीक्षा आणि मग मैदानी परीक्षा होते. त्यानंतर दोन ते तीन पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण चालते. हे प्रशिक्षण जवळ नऊ महिने चालू असते.