महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत कोरोना उपचार न दिल्यास कारवाई; आरोग्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई । महात्मा फुले योजनेअंतर्गत कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी मोफत देणे अपेक्षित आहे. तरीही काही रुग्णालये मात्र शुल्क आकारत आहेत. तर काही रुग्णालये कोरोनाबाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या गोष्टीची दाखल घेत, आता महात्मा फुले योजनेतील कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत मोफत उपचार न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले आहेत.

याशिवाय योजनेत समाविष्ट कोरोना उपचारासाठी शुल्क आकारल्यास पाचपट दंड घेणे, योजनेतून रुग्णालयांना वगळणे, रुग्णालयावर गुन्हा दाखल करणे अशी कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. अधिकाधिक खासगी करोना रुग्णालयांना योजनेत समाविष्ट करून रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष देण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोना उद्रेकाच्या काळात महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वासाठी खुली केली आहे. योजनेत श्वसनासंबंधी २० प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. यामध्ये ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा कमी झालेल्या सर्व रुग्णांच्या १० दिवस मोफत उपचारांची सुविधाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com