गलवानमधून चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला ३ सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ पासून चिनी आणि भारतीय सैन्य मागे हटले आहे. दोन्ही सैन्यातील हिंसक संघर्षानंतर २० दिवसांनी दोन्ही देशाचे सैनिक दीड किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. अशा वेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत काही प्रश्न विचारले आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी टि्वट करुन सरकारला ३ प्रश्न विचारले. राष्ट्रहीत सर्वोच्च असून त्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. असं म्हणत त्यांनी खालील ३ प्रश्न केंद्र सरकारला विचारले..

१)तणाव निर्माण होण्याआधीची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्यावर का भर देण्यात आला नाही?

२) आपल्या हद्दीत २० निशस्त्र जवानांची हत्या करणाऱ्या चीनला ते योग्य आहेत हे ठरवण्याची संधी का दिली?

३) गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय?

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील तणावामुळे गेले ८ आठवडे तणाव सुरू असून पँगॉग त्सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंग या ठिकाणी चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. चीनच्या लष्कराने सोमवारी सीमेवरून माघारी सुरू केली असून गलवान खोरे व गोग्रा हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांनी सैन्य तातडीने माघारी घेण्याची गरज यावेळी प्रतिपादन करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

 

Leave a Comment