प्रिया बेर्डे यांच्या नंतर आता ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर. सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील.

तसेच त्यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे तीनही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

याआधी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केला होता. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या व्यक्तिमत्त्ववामुळे आणि कलाकारांच्या बद्दल त्यांच्या मनातील आपुलकीमुळे आपण राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment